इंग्लंड दौर्यासाठी युवा क्रिकेटपटूंना संधी   

मुंबई : आगामी इंग्लंड दौर्‍यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयकडून  भारतीय संघाची घोषणा झाली आहे. या संघाचा कर्णधार म्हणून शुभमन गिलची  निवड करण्यात आली आहे. तर ऋषभ पंत  हा उपकर्णधार असेल. काही दिवसांपूर्वीच रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनीही कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली होती.

त्यामुळे इंग्लंड दौर्‍यावर या दोघांच्या अनुपस्थितीत भारतीय संघाला खेळावे लागणार आहे. भारतीय संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीर याला कसोटी क्रिकेट संघात तरुण नेतृत्व आणि नव्या दमाचे खेळाडू हवे होते. त्यामुळे गौतम गंभीर हा रोहित शर्मा आणि विराट कोहलीला भारतीय संघात खेळवण्यासाठी उत्सुक नव्हता. विराट कोहलीला संघात स्थान मिळाले असते तरी त्याच्याकडे कर्णधारपद नसते. यामुळेच विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी इंग्लंड दौर्‍यापूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

यंदाच्या आयपीएल स्पर्धेत तडाखेबंद फलंदाजी करणारा आणि ऑरेंज कॅपचा मानकरी साई सुंदरला कसोटी संघात स्थान मिळेल, अशी  आशा होती. तो रोहित शर्माच्या जागी सलामीला येईल, अशी अटकळ बांधली जात होती. ही अटकळ खरी ठरली असून साई सुदर्शनचा भारतीय क्रिकेट संघात स्थान समावेश करण्यात आला आहे.

बीसीसीआयने घोषणा केलेल्या कसोटी संघात शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर  या फलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे. भारताचा संघ ( शुभमन गिल (कर्णधार) ऋषभ पंत (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक) , यशस्वी जैस्वाल, के. एल. राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमरा, सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव

इंग्लंड दौर्‍याचे वेळापत्रक

पहिली कसोटी: 20-24 जून 2025 - हेडिंग्ले, लीड्स

दुसरी कसोटी: 2-6 जुलै 2025 - एजबॅस्टन, बर्मिंगहॅम

तिसरी कसोटी: 10-14 जुलै 2025 - लॉर्ड्स, लंडन

चौथी कसोटी: 23-27 जुलै 2025 - ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर

पाचवी कसोटी: 31 जुलै-4 ऑगस्ट 2025 - द ओव्हल, लंडन

 

Related Articles